सकाळी सकाळी…..मी घरकामात आहे काहीतरी… पिल्लू खेळतोय बाल्कनीत. दूडूडूडू धावत येतो माझ्याकडे आणि म्हणतो, “मम्मी.. मम्मी…, माऊ .. माऊ….” मला नेतो बाल्कनीत….
मी विचारते त्याला “कुठेय माऊ???”….. “माऊ कुठे दिसली तुला?”. बाल्कनीतून तो समोरच दिसणार्या मोठ्या झाडाच्या शेंड्याकडे बोट दाखवतो…… “झाडाच्या शेंड्यावर कुठे बसणार माऊ!!!!!!!!!”
बाजूच्यांकडे घरच्यासारखीच असणारी मांजर दिसली असेल ह्याला असा विचार करत मी परत फिरणार तोच झाडाच्या शेंड्यावर बसलेला बंदर दिसतो ……
….. माझ्या पिल्लुची माऊ !!!!!!!!!! त्याला पटकन उचलून घेऊन आम्ही मायलेकं बघत बसतो माऊ….. आयुष्यात पहिल्यांदाच मी पण बंदर बघतेय जणू !!!!!!!!
चिरंजीवांना घेऊन शनिवारच्या संध्याकाळी निघालीय मी फिरायला….. जाताना चिउ, काऊ माऊ, भू:भू सगळे भेटताहेत आणि चिरंजीवांची अखंड बडबड चालू आहे (चिउ काऊच्याच भाषेत….
) इतक्यात जवळ आलेला भू:भू दूर जातो. मी विचारते पिल्लुला, “अरे गेला भू:भू……कुठे गेला??? भू:भू कुठे गेला???”
क्षणाचाही विलंब न करता चिरंजीवांचे उत्तर तयार , “आफिश्… ” … ![]()
नंतर माझा प्रश्न “माऊ कुठे गेली???” …. “आफिश्….”
“पप्पा कुठे गेले??? “….. “आफिश् …..”
“चंदामामा कुठे गेला”…… “आफिश् ……”
दृष्टीच्या टप्प्यात नसलेले सगळेच आफिसात जातात बहुतेक…….!!!!!!!!!!!!!
एका दुकानात सामान घ्यायला थांबलोय आम्ही, नवरा सामान घेत असताना एक काकू बोलताहेत लेकाशी. hello झालं, ओळख झाली, शेवटी त्या विचारतात “नाव काय तुझं? ” मीच सांगते पहिले “अथर्व”……पुढे चिरंजीव … “बम्माश आए ……”….
रात्री जेवण झाल्यावर जरा पाय मोकळे करायला म्हणून निघालोय आम्ही लेकासोबत …. जाताना लेकाला मधे कडेवर, मधे पायी असं घेऊन चाललोय त्याच्या चिमण्या पावलांनी चालत आजूबाजूचं जग नव्या नजरेनी बघतोय….. आम्ही दोघं बोलत असताना मधेच चिरंजीव “पपा.. पपा… पपा….”….पपांनी लक्ष दिल्याशिवाय आणि त्याच्याकडे बघितल्याशिवाय काही पापाचा जप थांबत नाही…… पपांनी “काय?” असं म्हणताच….. चिरंजीवांची फर्माईश… “चॉकेत ….” पपाला कोण आनंद!!!!!!!!! पहिल्यांदाच लेकानी मागितलंय काही तरी…… माझं आइसक्रीम राहिलं बाजूला… पहिले स्वारी चॉकेत घ्यायला वळते……
सकाळी सकाळी चिरंजीवाना जाग आल्यावर चड्डी बदलवण्याचा वगैरे कार्यक्रम चालू आहे… इतक्यात… ” पूकक…..” असा आवाज काढत किंचित तिरपे होत पिल्लू गोड हसतोय माझ्याकडे पाहात…. मी पण हसतेच आहे तोच चिरंजीव “पुककू नाई….. !!!!!!” ….
सध्या अश्या अनेक बोबड्या बोलांसोबत युद्ध चालू आहे….. चुकत, माकत परत सुधरवत आम्ही शिकतोय…. नवीन नवीन शब्द कळताहेत….. एकदा का व्यवस्थित बोलता यायला लागलं कि मात्र हे बोबडे बोल ऐकायला कान तरसतील….. तेव्हा हे बोबडे बोलच सोबत करतील…. त्यासाठीच हा सगळा खटाटोप….
Filed under: चिमणी पावलं, छोट्या छोट्या गोष्टी

same feelings here…..they get the correct words fast so I try not to correct my 2 yr old…
he used to say offchis for so many days
Do record it so you can get into that nostalgia sometimes later……
Its true Aparna, they catch very fast….. Its good idea to record these things….
it will accompany us later and even our kids would like to hear it when they grow up …
Nice………
Thank you Abhishek..
chhan lihile aahe.
धन्यवाद अस्मिता…..
aamhi doghehi wat baghat aahot he bobade bol aamhala kadhi aikayala milanar yachi.
मिळेल लवकरच…… एकदा का घरात बोबडे बोल चालू झाले कि आयुष्याची रंगत अजून वाढते आणि आयुष्य त्याभोवतीच गुंफल्या जाते …
Namaskar
Bobade Bol Chan watle. Majya aali. Keep the audio and Vedio record of all. Jayil sare uduni- Theuni fakt athwani.
( Jeevnachya Ragadyatun – Blog Karite )
Bhagwan Nagapurkar
धन्यवाद काका आणि ब्लॉगवर स्वागत…. हो हे खरं आहे कि पुढे फक्त आठवणीच उरतील…. त्याच टिपतेय ह्या ब्लॉग च्या निमित्याने….. आणि हो त्या रेकॉर्ड पण नक्की करून ठेवेन
I too am waiting for my kido to talk
माझ्याही आयुष्यात या सुंदर ,मन सुखावणाऱ्या आठवणी आहेत ! तुम्ही जतन करताय खरच खूप छान !
धन्यवाद गीतांजली…