संध्याकाळी नेहमीप्रमाणे ६ :३० च्या बस मध्ये चढली … कधी नव्हे ते थोडं वेळेच्या आधी आल्यामुळे खिडकीजवळची जागा मिळाली. ह्याच खुशीत होती आणि बाजूलाही कोणी नव्हते. खाली एक मुलगी कुणाला तरी फोन लावायचा प्रयत्न करत होती आणि समोरची व्यक्ती कदाचित फोन उचलत नसल्यामुळे तिच्या चेहऱ्यावरचा वैताग स्वच्छ दिसत होता.
इतक्यात ड्राइवर ने बस चालू केली आणि ती मुलगी त्रसलेल्या चेहर्यानेच बस मधे चढली. जागाही नेमकी माझ्याच बाजूला रिकामी होती. जागेवर स्थानापन्न होताच मघापासून लागत नसलेला ह्या बाईंचा फोन लागला.
“हं, हेलो, कुठे आहेस तू ????” आवाज चढलेलाच होता
“…..”
“मी बसली आता ह्या बस मधे. “
“…..”
“मला आधी नाही सांगायचं का मग…!!!! “
“…..”
“अरे दोन मिनिटापूर्वी फोन उचलला असतास तर मी दुसऱ्या रूट ची बस नसती का पकडली!!!! आता काय फायदा??” एव्हाना आवाज अजून वाढला होता.
“…..”
“आता सॉरी म्हणून काय फायदा!!!! माझ्या बाइक ची चावी थोडी मिळेल मला…”
फोन कट….
एकदम सगळं शांत झाल्यासारखं वाटलं मला. २-३ मिनिटं असेच शांततेत गेले… तोच मागून गाणं गुणगुणायचा आवाज ऐकू आला “सच केह रहा है दिवाना… दिल… दिल ना किसी से लगाना…” , मागे बसलेली मुलगी कानात एअर फोन टाकून जोरजोरात गाणं म्हणत होती. परत बाजूच्या पोरीचा फोन वाजला…
“बोल …”
“……”
“तू असा कसा करतोस???? एक तर मला आधी काहीच सांगितलं नाहीस…. मला कुठून कळेल मग हे सगळं ….”
“…..”
“मी जाईन पायी …”
“…..”
“मला कुणाची गरज नाही… मी जाईन पायी सांगितलं नं ” ….. “मैने हर लम्हा जिसे चाहा जिसे पूजा, उसिने यारो मेरा दिल तोडा… तोडा, तन्हा…. तन्हा छोsssडा…” मागची मुलगी अजुन सूर लावत होती
“…..”
“नकोsss… . मी जाईन पायी…”
“….”
“तू खरंच काही कामाचा नाही. you are useless… “
“…..”
“मला काही नको सांगू आता.. ठेवू फोन”
“…”
“ठेवते..”
नशीब फोन तरी आपटला नाही रागाने…. माझ्या मनात येऊन गेलं. परत पाच मिनिटं असेच गेले शांततेत. खिडकीतूनही आता बरीच थंड हवा येत होती. मी खिडकी लावली. एव्हाना बाजूच्या पोरीचा राग पण थोडा शांत झालेला दिसत होता तोच फोन वाजला…
“हं …”
“….”
” जाईन मी पायी तिथून. जास्त दूर नाही माझं हॉस्टेल”
“….”
“हो खरच जाईन मी. तू काही काळजी करू नकोस…”
“….”
“हेच जर तू मला आधी सांगितलं असतं तर कशाला मी ह्या गाडीत बसले असते…”
“….”
“ह्मम्म्म, ठीक आहे”
“…”
“ठेवते मग आता फोन”
परत शांतता… मागची पोरगी पण जरा शांत झाली होती. मोबाइल मधे दुसरं गाणं शोधत होती बहुतेक. ह्या वेळी मात्र बराच वेळ झाला …. विसेक मिनिटं तरी निघून गेली…. अशीच. फोन परत वाजला…
“बोल नं..”
“….”
“नाही आता कसं येणं शक्य आहे. मी थकलीय खूप.”
“……”
“आता?? काही नाही. जेवण केलं की झोप …मस्त”
“….”
“हो जाणारेय ना”
“….”
“हो गाडीपन मस्त आहे आणि गाडीवाला पण…
” ….. “पेहेला नशा पेहेला खुमार … नया प्यार हैं नया इंतजार…” मागच्या मुलीचं गाणं बदललं होतं आता.
बाजुचीचा पण आवाज एकदम कमी झाला होता आता. काय बोलतेय हे मला पण ऐकू येईना.
“ओके, ठीकेय “
“….”
“हो…नक्की.. “……. “उसने बात की कुछ ऐसे रंग से…. सपने दे गया वो हजारो रंग के…”
“….”
माझा स्टॉप आला तरी फोन वर कुजबुज चालूच होती. उतरताना एकदा बघितले तिच्याकडे…. उमलणाऱ्या कळीसारखी भासत होती ती … आणि कानावर सूर पडत होते…”पेहेला नशा, पेहेला खुमार … नया प्यार हैंsss …. नया इंतजारsss …….”
Filed under: छोट्या छोट्या गोष्टी, ललित Tagged: | ललित, bus

हा हा.. गाणी आणि मूड्स यांची छान सरमिसळ केली आहे.. मस्तच..
awadali post
मस्त पोस्ट आहे….
Wah chhaan …
खुप छान लिहिले आहे
हेरंब, सुदर्शन, सहजच, शिवचंद्र, प्रशांत पोस्ट आवडल्याबद्दल धन्यवाद….
मस्त पोस्ट …आवडली .
धन्यवाद देवेंद्र
मस्त पोस्ट आहे…. लिखाण खूपचं मस्त आहे प्रीती …
दोन्ही मूड्स मस्त निभावले गेले , जशा दोन parallel stories चालू होत्या ..
Thank you Rohan…
Hahahaa
Malahi kahisa athavtay
Lagna jhalya jhalya nhavryavar kahi na kahi karna narna raag yeto. Tya nantar pahilya phone varcha aapla tone ani 6-7 phone varcha aapla tone kasa change hoto. Ajun hi tech hota.
mast combination…ekdam….