अरबांच्या देशात !!!

अरबांच्या देशाची मजाच न्यारी… इथे दिसतात सगळीकडे बुरखेवाल्या बायका आणि पांढर्या वेशातील पुरुष… बायका खरंच सुंदर असतात, बार्बी डॉल सारख्या बाहुल्या दिसतात… बुरख्याच्या आत पक्कया मॉड असतात !!!! पण बुरखा मात्र घालतात आणि संस्कृति आपली जपतात…

पांढर्या डगल्यातले पुरूष… उंचपुरे आणि राकट असतात… डोक्यावर पांढरा रुमाल नि त्यावर काळी रिंग घालतात….  खिशात फेरारीची चाबी घेऊन फिरतात आणि दोन दोन बायका पण फिरवतात… :) (अर्थात लग्नाच्या !!!!)

इथे येण्याआधी खरंच प्रश्न पडला होता आपल्यालापण बाहेर पडताना खरंच बुरखा घालावा लागेल काय??? एकटीला बाहेर पडता येईल का???? पण ह्या अरबांच्या देशात तसा काही नियम नाही… एक्सपॅट्सला बुराखाच काय मिनी माइक्रोचे पण बंधन नाही !!!!

टाइम पास करायला इथे मॉलशिवाय  दुसरे साधन नाही… जे काही आहे ते सर्व मॉल आणि मोठमोठ्या  बिल्डिंग्स… पण तरी भावते ती इथली शांतता !!!! रस्त्यावर गडबड नाही गोंधळ नाही की सदा असणारा ट्रॅफिक जॅम नाही… अगदी गावात सुद्धा गाड्या ८०-१००  च्या स्पीडने धावतात मात्र स्पीड लिमिटचे बंधन अगदी काटेकोरपणे पाळतात !!!!

अरबांच्या देशात अशी आहे मजा… उन्हाळ्यात मात्र उन म्हणजे एक सजा… पाच-सहा महिने जास्त उन्हाचे सोडले तर बाकी वातावरण पण छान असते…  अगदी गुलाबी नाही तरी थंडीतही जान असते….

अरबांचा हा देश एकदा बघायला हरकत नाही… वाळवंटातून रेती तुडवत डेझर्ट सफारीची मजा घ्यायला हरकत नाही… वाळवंटातून दिसणारा सूर्यास्त समुद्रातून दिसणार्‍या सूर्यास्ता-इतकाच भावणार…. सगळीकडे रेतीच रेती का असेना पण त्यातले सौंदर्य नक्कीच  वेडावणार  !!!!!!

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Connecting to %s

Follow

Get every new post delivered to your Inbox.