पाऊस….

ऑफीस मधे काम करत असताना बाहेरच्या दुनियेचा काही पत्ताच नसतो, आपला पीसी आणि आपण असं दोघांचंच जग असतं पण आज मात्र अचानक घु..घु.. असा आवाज यायला लागला आणि सगळेच लोकं आपापल्या जागेवरून उठून  बघू लागले.. अरे झालं  काय, कसला आवाज येतोय आणि अचानक लक्ष खिडकीच्या बाहेर गेलं…. बघतच रहावसं वाटलं…

दिसत होती ती फक्त उडणारी धूळ, झाडांची पाने, एखादा जीव गेलेला पेपर….. थोड्याच वेळात पावसाला सुरूवात झाली आणि जे दिसत होतं ते पण दिसेनासं झालं…  आता दिसत होत्या त्या फक्त कोसळणाऱ्या धारा, गारांसारखे दिसणारे टपोरे थेंब, काही मिनिटातच रस्त्यावरून वाहणारे पाण्याचे लोट, झाडाची तुटलेली फांदी, रस्त्यात उभ्या असलेल्या माणसाविना असणार्‍या गाड्या,  आणि दूरवर दिसणारी पावसाने झाकलेली टेकडी….

पावसाला सुरूवात झाली… दरवर्षी नेमाने येणारा तरीही येत पर्यंत अगदी चातकासारखी वाट पाहायला लावणारा हा पाऊस… तापलेल्या उन्हाळ्यानंतर येणारा पाऊस म्हणजे तहानलेल्या जिवाला आसरा जणू.  लहानपणी पावसात भिजण्यात जितका आनंद होतो तितकाच मोठेपणीही…. आपल्या नातवला कागदाची होडी करून दाखवून ती पाण्यात सोडताना लहान होणारे आजोबा आपले बालपणच जगत असतात… परत एकदा…. पावसात फुटबॉल खेळणाऱ्या चिखलाने माखालेल्या मुलांचाही हेवा वाटायला लावणारा हा पाऊस… बालपण तात्पुरतं का होईना परत देणारा हा पाऊस…

घरी बसून आईच्या हातची भजी खात, चहा घेत गप्पांना आलेला उत, त्यातच पावसात चिप्प भिजत येणारी एखादी बहीण किंवा भाऊ, जातानाच छत्री, रेनकोट काही नेता येत नाही का म्हणून रागवणारी तरीही सर्दी होईल म्हणून घसाघसा डोकं पुसनारी आई… आणि… गप्पात परत सामील होत खोड्या काढणारा भाऊ अथवा बहीण…. रोजच्या धावपळीत तात्पुरतं का होईना  सर्वांना एकत्र बसायला लावणारा हा पाऊस….

आधीच सुटलेला अंगावर शहारे आणणारा थंडगार वारा, त्यात त्याची वाट पाहत उभी असलेली ती, तिला दुरून बघत तिच्या चेहऱ्यावर उडणार्‍या बटा हाताने दूर करण्याचा मोह आवरत तिला न्याहाळणारा तो… त्याला समोर बघताच  खोडकर हसू लपवत, लटके रागवारी ती… अचानक ढगाचा आवाज होताच त्याला बीलगणारी ती… त्याच्या प्रियासीचा राग घालवण्याचे सामर्थ्य असलेला हा पाऊस….

दुरावलेल्या मित्रांची अचानक झालेली फोनाफोनी, ठरलेला ट्रेकिंगचा बेत, अंगावर पाऊस झेलत एकमेकांना हात देत चढलेली चढण, रानावानातून हिंडत चिखल तुडवत गाठलेला एखादा गड, रस्त्यातल्या एखाद्या टपरिवर कितीतरी दिवसांनी घेतलेला एकत्र चहा… दुरावलेल्या मैत्रिला जवळ आणणारा हा पाऊस…

रानावानातून झुळझुळ वाहणारे झरे, एखादा लगीन घाईने कोसळणारा धबधबा, गावातावर दिसणारे दवबिंदू, धुक्याने वेढलेले पर्वताचे टोक, पाठशिवणीचा खेळ खेळत मधेच सूर्याला संधी देणारे ढग आणि सजलेल्या हिरव्या शालुने नटलेल्या धरतीला बघण्यासाठी आसुसलेला सूर्य… निसर्गाचा अत्तुत्तम आविष्कार म्हणजे पाऊस…

Advertisements

13 प्रतिसाद

 1. छान लिहिलयस…आवडलं…माझ्या ऑफिसमधल्या खिडकीतून देखील असाच पाऊस दिसतो.
  🙂

  • प्रतिक्रिया नोंदवल्याबद्दल आभार, असा पाऊस पाहण्यात मस्त मजा येते नाही !!!!

 2. kay dhamal yete ashya pahilya pavasat bhijanyat… Sadhya US madhye ahe tar khup miss kartey mi paus punyatala gharcha paus….

  • हो ग अमृता, घरी सगळे सोबत बसून पावसाचा आस्वाद घेण्यात वेगळीच मजा असते…

 3. मस्त!
  आणि जीव गेलेला पेपर….. 🙂

 4. तुला मी केलेलं छोटं छोटं लिखाण वाचायला आवडेल का?
  मला तरी वाटतं कि तुझा जास्त वेळ मी नाही खाणार.
  माझा ब्लॉग-
  http://restiscrime.blogspot.com/
  धन्यवाद.
  🙂

  • अनघा, तुझं लिखाण वाचायलाही नक्कीच आवडेल… 🙂 वेळ मिळताच मी नक्की वाचेन

 5. bapre, he sagla tu lihilas yavar vishvasach basat nahiy :), khupach chhan aahe

 6. Best ahe ha ekdam…baryach barik goshti tiplya ahes 🙂

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: