निकाल

काल दहावीचा निकाल लागला, तसा हा महिना निकालांचाच महिना, पहिले बारावी मग CET आणि आता दहावी. सतत कुठला ना कुठला निकाल लागतोय. आपला निकाल मात्र केव्हाच लागलाय, दहावी काय नि बारावी काय ते डोंगर केव्हाच मागे पडलेय, सध्या आयुष्याची गाडी सरळसोट मार्गावरून धावतेय. रोजचा दिवस सारखाच… विशेष असं काहीच नाही. सकाळी उठून आवरून ऑफीस गाठणे, ऑफीस मधली कामं  उरकने, परत सगळं पटापट आवरून घर गाठणे आणि रात्रीचा सगळं आवरून निद्राधीन होणे. किती तरी दिवस झले हे असंच रुटीन चाललंय, शनिवार, रविवार त्याला जरा अपवाद आहेत पण तेही थोड्या फार फरकाने सगळे सारखेच. त्यांचं पण एक ठराविक रुटीन आहेच अमावसे पोर्णीमेसारखं…

बारावीचा निकाल मात्र आयुष्याची दिशा ठरवणारा असतो… घडवणार की बिघडवणार हे तुमच्या हाती… माझा निकाल होता तो दिवस मला चांगलाच आठवतोय, त्यावेळी आम्ही धुळ्याला होतो आणि नेमका निकाल जाहीर होणार त्या दिवशी सप्तशृंगी देवी, त्र्यंबकेश्वर असं फिरायला गेलो होतो. बारावीचा निकाल, त्याचा सीरीयसनेस असं काहीच वाटत नव्हतं. बरेच दिवसांनी भेटलेल्या आत्येमामे भावंडासोबत, फिरण्यात, हुंदडण्यात, मजा करण्यात निकालाचं काही tension वाटत नव्हतं आणि आता सारखी जीवघेणी स्पर्धा पण नव्हती. म्हणजे अर्थातच स्पर्धा होती पण थोडे कमी मार्क्स मिळाल्याने आपल्यावर डोंगर कोसळेल ही भावना निश्चितच नव्हती. आता जर ६०% च्या कमी मार्क्स मिळाले तर पुढे जॉब साठी elligible नाही होता येणार हे ठाऊकही नव्हतं. आणि त्यामुळेच त्याची पर्वाही नव्हती. फक्त चांगला अभ्यास करून चांगले मार्क्स मिळवायचे इतकंच माहीत होतं……………

तर सगळी देवदर्शनं करून, मौज मजा करून रात्री परत यायला एक वाजला त्यामुळे निकाल लागून गेला तरी मला माझ्या निकालाचा पत्ताच नव्हता आणि तेव्हा इंटरनेट वर आतासारखा निकाल जाहीर होत नसल्यामुळे तसाही बघता येत नव्हता. पास तर नक्कीच होईल अशी खात्री होती पण थोडी धास्ती होतीच. रात्री निद्रादेवीची आराधना करताना धास्ती अजूनच वाढली. जसजशी रात्र वाढु लागली विचारही वाढु लागले. बोर्डाचे पेपर आठवायला लागले. आपण काही लिहिलंय की नाही असंही वाटायला लागलं. अरे जीवशास्त्र, हो जीवशास्त्राचं तर आपण काही लिहिलंच नाही. जे सुचेल ते, जे मनाला भावेल ते टाकलंय फक्त. वेगवेगळ्या diseases चे syndrome हे तर आपण कधी वाचलेही नव्हते तरी लिहून आलोय आपण. काय लिहिलंय नक्की!!!!!!!!! काही तरी खरडलंय हे तर खरं…नक्कीच चुकलं असेल ते… आता काही आपलं खरं नाही, आपण नक्कीच नापास होणार. निदान जीवशास्त्र तरी नक्कीच आपला जीव घेणार.  काय वाटेल आई बाबांना आपल्याविषयी, काय दिवे लावले पोरीने. कॉलेज मधल्या मैत्रिणी कश्या बघतील आपल्याकडे!!!!!! आपलं काही खरं नाही….चढत्या रात्रीबरोबर अश्या प्रकारचे विचारही चढू लागले!!!!!!!!!! सकाळी उठेपर्यंत तर आपण नापसाच होणार, जीवशास्त्र नक्की राहणार ह्यावर माझं शिक्का मोर्तब झालं… मनाशीच….

दुसरा दिवस रविवार, कॉलेज बंद, आताशा तर पेपरातही निकाल येत नव्हता. आली का परत पंचाईत. आता काय करावं!!!!!!!!!! शेवटी म्हटलं मैत्रिनीकडे जाऊन बघू या काय करता येईल ते, तिलाच विचारू, काही तरी मार्ग निघेल. गाडी स्टार्ट  केली,  तडक मैत्रिणीचं  घर गाठलं.  नशीब ती तरी घरी होती… ती म्हणाली तिला ६४ का ६५% मार्क मिळाले. म्हटलं माझे बघितले का??? ती म्हणाली रोल नंबर कुठे सांगितला होता तू .. 😦 मनात म्हटलं बरंच झालं उगाच भलते सलते मार्क हिला कळायचे!!!!!!!  मग तीच म्हणाली चल कॉलेज ला जाऊन बघू. पण आज तर रविवार कॉलेज कुठे उघडतंय…. तरी तिच्या म्हणण्याप्रमाणे निघालो दोघी…

मेन गेट तरी उघडं होतं. गाडी पार्क केली आणि ऑफीस मधे घुसलो. काही लोकं होते आत admin वाले. एका काकांजवळ गेलो आणि म्हटलं की रिज़ल्ट पाहायचाय. त्यानी असं बघितलं न माझ्याकडे की काय मुलगी आहे काल रिज़ल्ट लागला आणि ह्या बाईला अजून काही पत्ता नाही. दुसऱ्या टेबलाकडे बोट दाखवत म्हणाले तिकडे बघा त्या डेस्क वर बघायला मिळेल.

तिकडे गेलो तिथल्या काकांना विचारलं. ते म्हणाले रोल नंबर सांगा. नंबर तर सांगितला पण गोळाच आला पोटात म्हटलं आता ह्या लोकांसमोर निकाल बघायचा म्हणजे ह्यानाही कळेल आणि काही कमी जास्त असेल तर उगाच ह्यांनाच  आधी कळेल. त्यांनी त्या sheet वरुन बोट फिरवत एक एक रोल नंबर चेक करत एकदाचा माझा नंबर मिळवला. त्यासमोरच्या लाईन वरुन बघत बघत शेवटी टोटल बघितली आणि मी डोळे फाडून बघतच राहिले…….. चक्क ८५% ….. 🙂 🙂 🙂 ……. माझा तर आनंदच गगणात मावेनासा झाला …. 😀 खरंच का माझे मार्क!!!!!!!!!!!!! विश्वासच बसेना…….. मैत्रिनिला म्हटला चिमटा काढ मला…. 😛 … आणि जीवशास्त्रात ८६  मार्क्स आउट ऑफ १०० !!!!!!!!!!!!!!!! 🙂 🙂 🙂

Advertisements

4 प्रतिसाद

  1. result च्या आदल्यादिवशीची रात्र काळ रात्र असते……कितीही परिक्षा दिल्यातरी रिसल्टचे टेंशन जीवघेणे असते
    anyways ८५ टक्के मिळाल्याबद्दल अभिनंदन…

    • गौरव, आभार आणि ब्लॉगवर स्वागत. result ची आदली रात्र खरच काळरात्र असते. सगळ्यात जास्त tension त्या रात्री असते.

  2. एवढे चांगले गुण मिळवल्याबद्दल तुझे अभिनंदन…
    पोस्ट खरच मस्त झाल आहे..तुझ्या भावना छान सादर केल्या आहेत…तुला पुढील शिक्षणासाठी खुप खुप शुभेच्छा….

    • देवेन्द्रजी, आभार आणि ब्लॉगवर स्वागत. तुमच्या comments नक्कीच माझा लिहिण्याचा उत्साह वाढवतील.. अजून चांगलं लिहायचा प्रयत्न करेन..

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: