शिवथरघळ

पुण्याच्या आजूबाजूला फिरायला कुठे जायचं हा आताशा प्रश्नच असतो. एक तर बरीच ठिकाणं पाहून झाली आहेत. दुसरं आणि मुख्य कारण म्हणजे weekend ला सगळीकडे असलेली प्रचंड गर्दी. सिंहगड, लोणावळा, खंडाळा इथे तर जत्रा भरल्यासारखी गर्दी असते आणि त्यातून परत ट्रॅफिक मधेच इतका वेळ जातो की तिथे जाणच नको वाटतं. शेवटी ह्या वेळेस आम्ही शिवथरघळ इथे वन डे पिकनिक साठी जायचं ठरवलं.

शिवथरघळ इथे रामदास स्वामिनी दासबोध लिहिला होता. वरून धबधबा आणि त्याखाली छोटीशी गुहा असे त्याचे स्वरूप आहे. हे ठिकाण पुण्यापासून अंदाजे १२० किमी दूर आहे. सातारा रोड वर भोर कडे जाणारा रस्ता पकडून पुढे महाड रोड ला लागायचं. भोर पासून साधारण ही घळ  ५७ किमी दूर आहे पण पहिले १३ किमी सोडले तर पुढे जवळपास घाटाचाच रस्ता आहे. आणि फारशी गर्दी नसल्यामुळे आपलीच गाडी राजेशाही थाटात जाते. रस्त्यात बरेच छोटे मोठे धबधबे आणि नदी सोबतीला असते.

घळीच्या आधी साधारण १०-१५ किमी आधी एक खिंड लागते, तिथले निसर्ग सौंदर्य तर अवर्णनीय. त्या वळणावरच काही चहा, भजीच्या टपऱ्या आहेत. ढगांनी वेढलेल्या ठिकाणी वरुन पडणाऱ्या भूरभूर पावसात गरमागरम भजी आणि चहाची लज्जतच न्यारी!!!!!!

इथून पुढे गेलं की महाड रस्ता सोडून उजव्या हाताला शिवथरघळ साठीचं मोठं प्रवेशद्वार दिसतं. तिथून साधारण ६ किमी आत जावं लागतं. हा रस्ता दोन्ही बाजूने हिरव्या जर्द झाडीने वेढलेला आहे. आणि खाली उतरत घळीच्या जवळ असलेया छोट्या गावात तो जातो.

ऐन पावसाळ्यात जर खूप पाऊस झाला असेल तर ह्या गुहेवरून पण पाणी पडतं आणि आत जाण्यासाठी भिजतच जावं लागतं असं इथले लोक सांगतात  मात्र आम्ही गेलो तेव्हा जास्त पाऊस नसल्यामुळे छोटासाच धबधबा होता. सध्या तरी विना गर्दीचं शांतता अनुभवण्याच हे ठिकाण आहे.

Advertisements

5 प्रतिसाद

  1. photo mast. shivtharghalimadhe jawoon aalycha fill aala. kharetar aankhi mahiti hawi hoti ajun maja aali asti. samrthani hey thikan kiti wichrpurwak niwdle hey smjun yet. manala shantta labhte…….pan khup bare watle.

    • ब्लॉगवर स्वागत प्राजक्ता, खरच मस्त ठिकाण आहे. हो, थोडं घाईत झालं खरं, पुढच्या वेळी निश्चितच जास्त माहिती देईल… 🙂

  2. मस्त जागा आहे..फ़ोटोपण छान आहेत..

    • हो, खूपच मस्त जागा आहे… आणि खूप दिवसांनी असं मस्त भटकली. पावसात भिजण्याची आणि भजी खाण्याची मजाच वेगळी..!!!

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: