अरबांच्या देशात !!!

अरबांच्या देशाची मजाच न्यारी… इथे दिसतात सगळीकडे बुरखेवाल्या बायका आणि पांढर्या वेशातील पुरुष… बायका खरंच सुंदर असतात, बार्बी डॉल सारख्या बाहुल्या दिसतात… बुरख्याच्या आत पक्कया मॉड असतात !!!! पण बुरखा मात्र घालतात आणि संस्कृति आपली जपतात…

पांढर्या डगल्यातले पुरूष… उंचपुरे आणि राकट असतात… डोक्यावर पांढरा रुमाल नि त्यावर काळी रिंग घालतात….  खिशात फेरारीची चाबी घेऊन फिरतात आणि दोन दोन बायका पण फिरवतात… 🙂 (अर्थात लग्नाच्या !!!!)

इथे येण्याआधी खरंच प्रश्न पडला होता आपल्यालापण बाहेर पडताना खरंच बुरखा घालावा लागेल काय??? एकटीला बाहेर पडता येईल का???? पण ह्या अरबांच्या देशात तसा काही नियम नाही… एक्सपॅट्सला बुराखाच काय मिनी माइक्रोचे पण बंधन नाही !!!!

टाइम पास करायला इथे मॉलशिवाय  दुसरे साधन नाही… जे काही आहे ते सर्व मॉल आणि मोठमोठ्या  बिल्डिंग्स… पण तरी भावते ती इथली शांतता !!!! रस्त्यावर गडबड नाही गोंधळ नाही की सदा असणारा ट्रॅफिक जॅम नाही… अगदी गावात सुद्धा गाड्या ८०-१००  च्या स्पीडने धावतात मात्र स्पीड लिमिटचे बंधन अगदी काटेकोरपणे पाळतात !!!!

अरबांच्या देशात अशी आहे मजा… उन्हाळ्यात मात्र उन म्हणजे एक सजा… पाच-सहा महिने जास्त उन्हाचे सोडले तर बाकी वातावरण पण छान असते…  अगदी गुलाबी नाही तरी थंडीतही जान असते….

अरबांचा हा देश एकदा बघायला हरकत नाही… वाळवंटातून रेती तुडवत डेझर्ट सफारीची मजा घ्यायला हरकत नाही… वाळवंटातून दिसणारा सूर्यास्त समुद्रातून दिसणार्‍या सूर्यास्ता-इतकाच भावणार…. सगळीकडे रेतीच रेती का असेना पण त्यातले सौंदर्य नक्कीच  वेडावणार  !!!!!!

Advertisements

पुन्हा एकदा सुरूवात !!!

खूप दिवसात टाकलं  नाही काहीच ब्लॉगवर … खरं तर  कंटाळा… निव्वळ कंटाळा… हेच आणि हेच कारण आहे त्याचं … कितीतरी नोंदी अर्धवट लिहून पडल्यात… त्यांना  परत रिव्यू करून टाकावं  असं  बरेचदा मनात येऊन सुद्धा त्याचा मुहूर्त काही लावला नाही. जसं देववर श्रद्धा, विश्वास हे आतूनच असावं लागतं… नुसतं  दोन वेळ उदबत्ती लावून  पूजा केल्याने देव पावत नाही आणि मनातही  श्रद्धा उत्पन्न होत नाही तसंच काहीसं लिहिण्याचं पण आहे असं मला वाटतं.  मनातून लिहिण्याची इच्छा उत्पन्न झाल्याशिवाय, ती उर्मी आल्याशिवाय नुसतं ठरवून कितीही म्हटलं तरी लिहिता येत नाही… 😐
 
आता इथे अबु-धाबीत येऊन चार महिने होऊन गेले… नोकरी मधून तात्पुरती सुट्टी घेतल्यावर निवांत वेळ मिळेल तेव्हा नक्की लिहु असं मनात हजारदा घोटून पण लिहिण्याला काही सुरूवात केली नाही…. सुरूवात केली नाही म्हणाण्यापेक्षा अर्धवट लिहून ते पूर्णत्वास नेलं नाही….
 
तर इतके दिवस रखडलेल्या कामाला अचानक सुरूवात करायला लावायला कामी आलाय एक पिक्चर, एक मूवी….. जो मला खरंच inspire करून गेलाय…. काही करायचं असेल तर ते आताच, वेळ नाही ही सबब किती दिवस चालवायची…  शेवटी…. “जिंदगी ना मिलेगी दोबारा …. !!!!!” …. खरंय ना 🙂 🙂

जरा मी जास्तच उशिरा बघितलाय हा सिनेमा… हे खरंय… पण काय करता… पिल्लू…. आता मोठा झालाय ना…. मस्ती पण वाढलीय….. खूप  दिवसांनी मिळालेला निवांतपणा आणि इथे अबु-धाबीला सोबत कुणीच नसल्यामुळे वाढलेली कामं 😐  ह्या सगळ्यामुळे वेळ कुठे मिळाला पिक्चर बघायला पण…. तरी वेळात वेळ काढून बघितला हेही नसे थोडके !!!

त्यामुळे शेवटी ठरवलंच….. काही का असेना, छोटं मोठं जे असेल ते, जे वाटलं ते, जसं असेल तसं काही तरी खरडायचं ….. कारण…. “जिंदगी ना मिलेगी दोबारा ”

आणि शेवटी   “वळवाचा पाऊस”   असाच येणार… अचानक ……….. नाही का 🙂