पुन्हा एकदा सुरूवात !!!

खूप दिवसात टाकलं  नाही काहीच ब्लॉगवर … खरं तर  कंटाळा… निव्वळ कंटाळा… हेच आणि हेच कारण आहे त्याचं … कितीतरी नोंदी अर्धवट लिहून पडल्यात… त्यांना  परत रिव्यू करून टाकावं  असं  बरेचदा मनात येऊन सुद्धा त्याचा मुहूर्त काही लावला नाही. जसं देववर श्रद्धा, विश्वास हे आतूनच असावं लागतं… नुसतं  दोन वेळ उदबत्ती लावून  पूजा केल्याने देव पावत नाही आणि मनातही  श्रद्धा उत्पन्न होत नाही तसंच काहीसं लिहिण्याचं पण आहे असं मला वाटतं.  मनातून लिहिण्याची इच्छा उत्पन्न झाल्याशिवाय, ती उर्मी आल्याशिवाय नुसतं ठरवून कितीही म्हटलं तरी लिहिता येत नाही… 😐
 
आता इथे अबु-धाबीत येऊन चार महिने होऊन गेले… नोकरी मधून तात्पुरती सुट्टी घेतल्यावर निवांत वेळ मिळेल तेव्हा नक्की लिहु असं मनात हजारदा घोटून पण लिहिण्याला काही सुरूवात केली नाही…. सुरूवात केली नाही म्हणाण्यापेक्षा अर्धवट लिहून ते पूर्णत्वास नेलं नाही….
 
तर इतके दिवस रखडलेल्या कामाला अचानक सुरूवात करायला लावायला कामी आलाय एक पिक्चर, एक मूवी….. जो मला खरंच inspire करून गेलाय…. काही करायचं असेल तर ते आताच, वेळ नाही ही सबब किती दिवस चालवायची…  शेवटी…. “जिंदगी ना मिलेगी दोबारा …. !!!!!” …. खरंय ना 🙂 🙂

जरा मी जास्तच उशिरा बघितलाय हा सिनेमा… हे खरंय… पण काय करता… पिल्लू…. आता मोठा झालाय ना…. मस्ती पण वाढलीय….. खूप  दिवसांनी मिळालेला निवांतपणा आणि इथे अबु-धाबीला सोबत कुणीच नसल्यामुळे वाढलेली कामं 😐  ह्या सगळ्यामुळे वेळ कुठे मिळाला पिक्चर बघायला पण…. तरी वेळात वेळ काढून बघितला हेही नसे थोडके !!!

त्यामुळे शेवटी ठरवलंच….. काही का असेना, छोटं मोठं जे असेल ते, जे वाटलं ते, जसं असेल तसं काही तरी खरडायचं ….. कारण…. “जिंदगी ना मिलेगी दोबारा ”

आणि शेवटी   “वळवाचा पाऊस”   असाच येणार… अचानक ……….. नाही का 🙂

Advertisements

8 प्रतिसाद

 1. sampala lekh?? evadhach??

  kharatar baryach diwasani tumcha lekh aala ani wachayla surwat keli pan kay to tar lagechach sampala

 2. चला सुरुवात झाली हे महत्वाच … हो ग वळवाचा पाउस असाच येतो…. 🙂
  मस्तच आहे तो सिनेमा… आणि कंटाळा येत नाही तो ब्लॉगर कसला…. 🙂
  येऊ द्या लवकर एखादी झकास पोस्ट…

  • खरंय कंटाळा येत नाही तो ब्लॉगर कसला…पण ह्या वेळी हा कंटाळा जरा जास्तच लांबला…

   सिनेमा खरंच मस्त आहे… आणि इतक्या दिवसांनी लिहिल्यावरही आठवण ठेवल्याबद्दल खरंच आभार 🙂

 3. Hello प्रीती,

  कशी आहेस?. बऱ्याच दिवसांनी लिहिलंस. तुझ्या नवीन पोस्ट ची वाट बघेल. वेळ खरच काढ.
  लिखाणाच्या बाबतीत मला एक गोष्ट नेहमी वाटायची की छान निवांत वेळ मिळालं की मग लिहीन, पण मग हळू हळू कळलं की असा लिखाण नाही होत. आपण लिखाण करायला निवांत बसून राहिलो पाहिजे असा काही नाही, कुठली ही छोटी किंवा मोठी गोष्ट करतांना काहीतरी सुंदर सुचू शकते, आणि जेव्हा सुचला तेव्हा वेळ काढण जरुरी असते.. कारण घरी राहून विचार केल्या पेक्षा बाहेर पडून जग पहिल्यानी जास्त सुचतं असा मला वाटतं… तू आता नवीन जग पाहते आहेस, तुझ्या नवीन अनुभवांवर वाचायला पण खूप आवडेल..
  तुला पुढील लेखनासाठी शुभेच्छा..
  रोहण..

  • धन्यवाद रोहन… हो, हे खरं आहे कि लिहायला निवांत असा वेळ मिळेलच असं नाही त्यामुळे जेव्हा जे सुचेल ते लिहिलेलंच कधीही उत्तम….
   पुढची पोस्ट लवकरच टाकेन

 4. तूला मेल टाकलेय बघ…. अबुधाबीत आहेस तू, मला अजिबात कल्पना नाहीये!!!

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: