Be Happy !!

Today I got a very good whats App message saying,

Take chances…
Tell the truth….
Learn to say NO…
Spend money on the things you love…
Laugh till your stomach hurts…
Dance Even if you are too bad at it….
Pose stupidly for photos…
Be child-like….

Moral: Death is not the greatest loss in life. Loss is when life dies inside you while you are alive….

Truly a very true message…always do the things you love in your life. It will make you happy from inside and if you are not happy how can you make others happy !!! If everyone around you is happy, definitely your life is full of happiness.

And here comes the second message:

“When you wish good for others, good things come back to you. This is the law of Nature.”

So be Happy and Spread Happiness !!!

Advertisements

Poverty !!!

APJ  Abdul Kalam ह्यांचं ‘Ignites Minds’ हे पुस्तक वाचायसाठी हातात घेतलं. ‘Dedicated To’ हे पहिलच पान वाचत असताना त्यातिल प्रसंग अनेक प्रश्न मनात निर्माण करून गेला. खरं तर खूपच  साधासा प्रसंग….

APJ Abdul Kalam एकदा  एका  शाळेत  व्याख्यानासाठी गेले  होते. तिथे त्यांनी मुलांना विचारलं…”तुमचा सगळ्यात मोठा शत्रू कोणता?”… अनेक मुलांनी वेगवेगळी  उत्तरं दिली पण  ADJ Abdul Kalam ह्यांनी हे पुस्तक जिला dedicate केलंय त्या मुलीनी जे उत्तर दिलं ते खरंच विचार करण्यालायक होतं… तिचं उत्तर होतं .. “गरिबी”…”poverty” !!!

गरिबी नसलीच किंवा थोडी कमी झाली तरी सगळेच नाही पण बरेच प्रश्न  खरंच सोडवता येतील… गरीबीच नसली तर त्यायोगे होणारे गुन्हे निम्यानी तरी नक्कीच कमी होतील… लोकांना दोन वेळच्या जेवणाची चिंता सतावणार नाही…. मोठ्या मुलाला/मुलीला लहान्याकडे लक्ष ठेवायला सांगून आईला कामावर जावे लागणार नाही… आणि… त्यामुळे आपोआपच शिक्षणाचे महत्व वाढून जास्त मुलं शिक्षण घेऊ शकतील आणि पर्यायाने शिक्षणामुळे माणूस शहाणा होईल…. विचार करायला लागेल… देशाची प्रगती होईल…. सगळंच जरा अवास्तव वाटतंय खरं पण निव्वळ अश्या विचाराने सुध्धा गोष्टी किती सोप्या वाटत आहेत… आशा ठेवायला काय हरकत आहे.. शेवटी आशेवरच तर आपण आयुष्य जगतो !!!

शिक्षणामुळे खरंच किती मोठा फरक पडू शकतो, ह्याचंच एक बोलकं उदाहरण … माझ्यापेक्षा एखाद्या वर्षानी लहानच असणारी माझी पोळेवाली जेव्हा मला म्हणाली कि तिची मोठी मुलगी १५ वर्षांची आहे आणि बाकी लोकं आता तिच्या लग्नाचं विचारत आहेत तेव्हा मी उडालेच. अजूनही अशी बालविवाह म्हणावी अशी लग्न आपल्या आजूबाजूलाच होतात म्हणजे !!!!! पण मी पुढे काही म्हणण्यापूर्वीच तीच पुढे म्हणाली “पण तिच्या पपांनी सरळ सांगितलं… शिकवू पोरीला, इतक्या लवकर लग्न-बिग्न काही नाही”…… 🙂  हे चित्र खरंच आशादायक आहे. तिचं स्वतःचं लग्न सुद्धा १५ व्या वर्षी झालं होतं पण मुलीसाठी त्यांनी शिक्षणाचा विचार पहिले केला ह्यालाच तर प्रगती म्हणतो नं आपण…

आपण आपल्यापुरता जरी विचार केला तरी कितीतरी गोष्टी आपण करू शकतो. गरिबी हटवनं खरंच कुणा एका माणसाचं काम नाही पण आपण काय करू शकतो किंवा आपण करतो ते सगळंच कितपत बरोबर अथवा चूक असतं हा विचार करावा लागावा असा नुकताच एक अनुभव आला…

नुकताच माझ्या लेकाचा पाचवा वाढदिवस आम्ही दणक्यात साजरा केला. नातेवाईक, इष्ट-मित्र, शेजारी-पाजारी बऱ्याच लोकांना बोलावले. आणि आताच्या नवीन प्रथेप्रमाणे ‘Return Gift’ पण दिले. काही गिफ्ट्स असेच दिले जसे पोळेवालीच्या मुलाला, कचरा नेणाऱ्या काकांच्या मुलाला, इत्यादी. पोळेवाली दुसऱ्या दिवशी येउन म्हणाली कि तुम्ही दिलेला कंपास माझ्या मुलाला खूपच आवडला, त्यावर कारचं चित्र होतं ते खुपच आवडलं त्याला.

नंतर एकदा असंच एका मैत्रिणीशी बोलत असताना कार्यक्रमाचाच विषय निघाला. सहज विचारलं तिला ‘तुझ्या पिल्लूला आवडलं का गिफ्ट?’ तर ती लगेच म्हणाली ‘हो अगं, चांगलं आहे पण खूप कंपास झालेत आता तिच्याकडे..!!!’ मी पुढे काहीच बोलली नाही… उगीच वाटले… का आपण कंपास असं गिफ्ट वाटलं???? ज्याला ज्या गोष्टीची गरज आहे त्याला ती मिळाली तर त्याचं महत्व खचितच जास्त असतं. आणि आधीच गरजेपेक्षा जास्त वस्तू असलेल्या पोरांना आपण अजून कितीही चांगली नवीन गोष्ट आणून दिली तरी दोन दिवसांपेक्षा जास्त त्याचं महत्व निश्चितच राहणार नाही…

प्रसंग छोटासाच पण मला अनेक गोष्टी शिकवून गेला.. गरज असलेल्या गरजवंताला केलेली मदत खरोखरच त्याच्यासाठी खुपच फायद्याची असते… कधी कधी आयुष्य बदलवणारी पण राहू शकते उलट निव्वळ दिखावा म्हणून  केलेल्या गोष्टींना काहीही अर्थ नसतो, एका दिवसाची हौस असते ती करणाऱ्याची पण आणि ज्याच्यासाठी केली त्याच्यासाठी पण….

चार लोकं करतात तेच मी केलं पण ते केलेलं चूक कि बरोबर हा विचार तेव्हा नाही पण आता नक्कीच माझ्या मनाला चाटून गेला !!!!

पुन्हा एकदा सुरूवात !!!

खूप दिवसात टाकलं  नाही काहीच ब्लॉगवर … खरं तर  कंटाळा… निव्वळ कंटाळा… हेच आणि हेच कारण आहे त्याचं … कितीतरी नोंदी अर्धवट लिहून पडल्यात… त्यांना  परत रिव्यू करून टाकावं  असं  बरेचदा मनात येऊन सुद्धा त्याचा मुहूर्त काही लावला नाही. जसं देववर श्रद्धा, विश्वास हे आतूनच असावं लागतं… नुसतं  दोन वेळ उदबत्ती लावून  पूजा केल्याने देव पावत नाही आणि मनातही  श्रद्धा उत्पन्न होत नाही तसंच काहीसं लिहिण्याचं पण आहे असं मला वाटतं.  मनातून लिहिण्याची इच्छा उत्पन्न झाल्याशिवाय, ती उर्मी आल्याशिवाय नुसतं ठरवून कितीही म्हटलं तरी लिहिता येत नाही… 😐
 
आता इथे अबु-धाबीत येऊन चार महिने होऊन गेले… नोकरी मधून तात्पुरती सुट्टी घेतल्यावर निवांत वेळ मिळेल तेव्हा नक्की लिहु असं मनात हजारदा घोटून पण लिहिण्याला काही सुरूवात केली नाही…. सुरूवात केली नाही म्हणाण्यापेक्षा अर्धवट लिहून ते पूर्णत्वास नेलं नाही….
 
तर इतके दिवस रखडलेल्या कामाला अचानक सुरूवात करायला लावायला कामी आलाय एक पिक्चर, एक मूवी….. जो मला खरंच inspire करून गेलाय…. काही करायचं असेल तर ते आताच, वेळ नाही ही सबब किती दिवस चालवायची…  शेवटी…. “जिंदगी ना मिलेगी दोबारा …. !!!!!” …. खरंय ना 🙂 🙂

जरा मी जास्तच उशिरा बघितलाय हा सिनेमा… हे खरंय… पण काय करता… पिल्लू…. आता मोठा झालाय ना…. मस्ती पण वाढलीय….. खूप  दिवसांनी मिळालेला निवांतपणा आणि इथे अबु-धाबीला सोबत कुणीच नसल्यामुळे वाढलेली कामं 😐  ह्या सगळ्यामुळे वेळ कुठे मिळाला पिक्चर बघायला पण…. तरी वेळात वेळ काढून बघितला हेही नसे थोडके !!!

त्यामुळे शेवटी ठरवलंच….. काही का असेना, छोटं मोठं जे असेल ते, जे वाटलं ते, जसं असेल तसं काही तरी खरडायचं ….. कारण…. “जिंदगी ना मिलेगी दोबारा ”

आणि शेवटी   “वळवाचा पाऊस”   असाच येणार… अचानक ……….. नाही का 🙂

सुखावणारी गाणी…

कधी असंच जुने, खास करून कॉलेजच्या वेळेसचे गाणे ऐकून वाटतं….. मस्त होते ते दिवस, आपले फुलपाखराचे होते, अनेक स्वप्नं होती, स्वप्नातला राजकुमार कोण हे माहित नव्हते आणि तो कोण असेल ह्यावर विचार करण्यात, त्याला imagine करण्यात पण खूप मज़ा होती….. धुंदी होती……..

आता ऑफीस मधे बसल्या बसल्याच कुणी तरी लावलेलं गाणं ऐकू येतय…

चाँद ने कुछ कहा, रात ने कुछ सुना, तू भी सुन बेखबरssss प्यार कर…. ओहोहोहो… प्यार करssssss

त्यावेळी हे गाणं ऐकताना पण प्रत्येक मुलगी स्वतःला मधुरी दिक्षित च्या जागी consider करत valentine च्या रात्री नक्की आपला शाहरूख भेटेल अशी आशा मनात ठेवून असते ??????

मी कॉलेज ला असताना अशीच खूप गाजलेली, वाजवून वाजवून गुळगुळीत झालेली कॅसेट म्हणजे “मोहब्बतें…” . आताही कधी त्या पिक्चरचे गाणे ऐकताना कॉलेजचे दिवस परत आल्यासारखे वाटतात….. कॉलेजच्या ट्रीप मधे केलेली धमाल आठवते….. मैत्रिणिने ह्या पिक्चरच्या गाण्यावर केलेला डान्स आठवतो….. 🙂

नुसती हि गाणी लागली तरी किती तरी आठवणी ताज्या होतात…. 🙂

मैत्रिणीच्या रूम वर तास न् तास बसून पीसी वर बघितलेलं एकच एक गाणं म्हणजे
“रंग रंग मेरे रंग रंग मे रंग जाएगी तू रंग, संग संग मेरे संग संग मे संग आएगी संग……….”
…….एकदा ऐकून….नव्हे बघून तर बघा हे गाणं…. मस्तच….. आपल्या जोडीदाराला सतत गर्दीत बघत राहणारी ती आणि गर्दितही सतत तिला शोधणारा तो आपल्याला आपल्या साखरपुडा आणि लग्नाच्या मधल्या काळाची आठवण करून देतो…….. 🙂

अशीच आणखी काही गाणी म्हणजे DDLJ ची गाणी, “तुझे देखा तो ये जाणा सनम….. ” अगदी evergreen ………. कधीही ऐका तितकंच फ्रेश वाटतं……

रात्री धाब्यावर वगैरे बस थांबली असताना, तिथल्याच एखाद्या पानठेल्यावर कधीही न ऐकलेले न गाजलेले गाणे चालू असतात… पण ती वेळच अशी असते नं की ते गाणे पण मस्त वाटतात…. तो मौसमच तसा असतो….. हिवाळा असेल तर थंडीत आणि नसेल तरीही रात्रीच्या त्या गारव्यात ती गाणी आपल्याला छानच वाटतात

जुनी गाणी तर सदाच evergreen …. . आणि बाहेर पाऊस चालू असताना गाडीच्या खिडकीतून अंगावर तुषार घेत जुने गाणे ऐकण्याची लज्जतच काही और!!!!!!!!!! गाण्यात पूर्णपणे समरस होऊन त्याच्या शब्दांचा आस्वाद घेत गाणं ऐकलं नं की गाणं पण कळत …. खरंच ….. ते आपलं वाटायला लागतं ….

माझा स्वतःचा असा अनुभव आहे की स्वतः लावलेल्या आवडीच्या गाण्यापेक्षा, surprisingly अचानकपणे कानावर पडलेलं आवडीचं गाणं ऐकण्यात जास्त मजा येते !!!!!!!!!! surprise माणसाला आवडतंच………कसही असलं तरी… 🙂

असंच आज surprisingly  “चाँद ने कुछ कहा, रात ने कुछ सुना…..” हे गाणं कानावर पडलं आणि वळवाच्या पावसासारखी ही पोस्ट तयार झाली ….. 😀

रांगोळी

रांगोळी म्हणजेच रंगांच्या ओळी. घरासमोर काढली जाणारी रांगोळी मांगल्याचे प्रतीक मानली जाते. किती तरी विविध प्रकारे रांगोळी काढता येते जसे फुले, पाने, थेंबांची रांगोळी, संस्कारभारतीची  रांगोळी.  भारतात वेगवेगळ्या प्रांतात रांगोळीला वेगवेगळी नावे आहेत. जालावरून काही नावे मिळवली ती अशी:

पश्चिम बंगाल : अल्पना
बिहार : रिपाणा
उत्तर प्रदेश : चोव्कपुराना
राजस्थान : मदाणा
तामीळनाडू : कोलम

दसरा, दिवाळी, संक्रांत, गौरी-गणपती अश्या सणांमधे रांगोळीचे खास महत्व आहे. दिवाळीला माझ्या आजोळी आम्ही अंगणभर रांगोळ्या काढत असु, मग कोणाची रांगोळी छान अशी स्पर्धा पण चाले. त्यासाठी शोधाशोध करून छानशी design आधीच शोधून ठेवावी लागे . आता मात्रा दरासमोर एकच रांगोळी काढता येते… फ्लॅट संस्कृतीचा परिणाम … 😦 मग त्यावरच दिवे, फुले ठेवून ती सजवली जाते. अश्याच एका दिवाळीला काढलेल्या रांगोळीचा फोटो काल जुने फोटो चाळताना सापडला, तोच आज टाकत आहे:

एखादा दिवस…

एखादा दिवस असतो असाच.. कंटाळवाणा… आळसावलेला……काही कारण नसतं तरीही उगाचच कंटाळा येतो सगळ्या गोष्टींचा, उदासवाणा वाटतो. काय बरं कारण असावं ह्याच्या मागे. नीट झोप झालेली नसणे, भूक लागलेली असणे, एखादी छोटीशी गोष्ट मनासारखी न होणे ज्यामुळे actually  कोणालाच काहीही फरक पडणार नसतो, कोणाला कशाला स्वतःला पण काहीच नाही. पण तरीही आपल्यालाच उदास वाटतं.

आणि मग एकदा का असा उदासवाणा दिवस चालू झाला की सगळंच उलट व्हायला लागतं. काही ना काही बिघडत जातं. सकाळी काम करायचा कंटाळा येतो, भाजी बिघडते, पोरगा पण सकाळी उठल्या उठल्या किरकिर करायला लागतो, घरून निघायला उशीर होतो, गाडी ट्रॅफिक मधे अडकते, ऑफीस मधे छोटंसं काम करताना पण चुका होतात, त्या निस्तरता निस्तरता दिवस जातो, एक ना दोन एकंदरच दिवस खराब जातो.

आणि अश्या दिवशी प्रयत्न करूनही चांगलं काहीच होत नाही, हातून घडत नाही.

पण आजच्या खराब दिवसातच उद्याचा चांगला दिवस लपलेला नसतो का? दुःखानंतर सुख, उन्हानंतर सावली, तसंच खराब दिवसानंतर चांगला दिवस, असंच काहीसं  असेल नक्की. त्याशिवाय आपल्याला त्याचं महत्व कळत नाही. रोजच्या रुटीनचा कंटाळा आला म्हणून आपण दोन-चार दिवस कुठे तरी फिरायला बाहेर पडतो आणि पाचव्याच दिवशी आपल्याला त्याही गोष्टींचा कंटाळा यायला लागतो. रोजचं रुटीनच बरं वाटायला लागतं. कधी एकदा घरी जाऊन त्यात अटकतो असं होतं. म्हणूनच आयुष्यात चांगल्या गोष्टींना वाईट गोष्टींची संगत हवीच असते. जीवनात नुसतं  गोडाला अर्थ नाही, मीठ मिरचीची फोडणी असल्याशिवाय आयुष्याला चव नाही.

आयुष्यही असंच असतं, सुख दुःखाचा पाठ शिवणीचा खेळ खेळणारं. पण मग काही लोकांच्या वाट्याला दुःखच का येतं नुसतं की सुखावरचा विश्वासच उडून जावा. अशीच लोकं  मग नास्तिक होतात का? कुणाच्या वाट्याला सुखच सुख असतं. पण सुख म्हणजे तरी काय. पैसा म्हणजे सुख का? की प्रत्येक गोष्ट मनासारखी होणे हे सुख? सुख हे पण शेवटी मानण्यावरच असतं, माणसाच्या मनावरच असतं. मग समाधान म्हणजे सुख का? मग समाधान तरी कोणत्या गोष्टीतून मिळतं? दुसऱ्यासाठी केलेल्या गोष्टीतुनही आपल्याला समाधान मिळतं. पण ती प्रत्येकच गोष्ट काही आपल्या मनासारखी नसते, बरेचदा तडजोड असते, कर्तव्य असतं, आणि ते पूर्ण केल्याचं समाधान पण असतं पण ते सुख निश्चितच नसतं.

मग सुख आहे तरी काय? कुठे मिळतं, कसं असतं, सगळ्यांसाठी सारखंच का नसतं? एकसाठी असणारं सुख दुसऱ्यासाठी  दुःखही असू शकतं. मग सुखाला आपल्याला शब्दात नाहीच बांधता येणार, ते असंच आहे चंचल, निष्पाप, खेळकर लहान बाळासारखं…एका जागी स्थिर नसणारं.

खरंच लहानपणीच माणूस सगळ्यात सुखी असतो. कुठलीही काळजी नाही चिंता नाही, अपेक्षा नाही आणि म्हणून अपेक्षाभंगाच दुःखही नाही. माणूस जसजसा मोठा होतो तश्या त्याच्या अपेक्षा वाढतात, काही पूर्ण होतात काही तश्याच राहतात आणि त्यातूनच मग अपेक्षाभंगाच दुःख येतं. मग अपेक्षा पूर्ण झाल्या तर सुख आणि नाही झाल्या तर दुःख असं असतं का? पण हे जर आपण खरं मानलं तर कधी कधी असंही होतं की कुठलीही अपेक्षा पूर्ण होण्याआधी आपल्याला वाटतो तितका आनंद ती पूर्ण झाल्यावर मिळत नाही. म्हणजे प्रत्यक्षात अपेक्षा पूर्ण होण्यापेक्षा “ही इच्छा पूर्ण झाली तर…” हा विचारच जास्त आनंद देतो. म्हणजे अपेक्षा पूर्ण होण्यातच सगळा आनंद, सुख सामावलेलं आहे असंही म्हणता येणार नाही.

फारच भरकटत चालले आहेत विचार…काही पण लिहितेय मी आज, जे मनात येईल जसं वाटेल तसं. कुठल्याच गोष्टीचा कशाशी काही संबंध नाही. आजचा दिवसच असा आहे, कंटाळवाणा… आळसावलेला…. पांघरुणातून डोकावून पहात  पुन्हा डोक्यावर पांघरूण ओढून झोपी जाणारा…..

पाऊस….

ऑफीस मधे काम करत असताना बाहेरच्या दुनियेचा काही पत्ताच नसतो, आपला पीसी आणि आपण असं दोघांचंच जग असतं पण आज मात्र अचानक घु..घु.. असा आवाज यायला लागला आणि सगळेच लोकं आपापल्या जागेवरून उठून  बघू लागले.. अरे झालं  काय, कसला आवाज येतोय आणि अचानक लक्ष खिडकीच्या बाहेर गेलं…. बघतच रहावसं वाटलं…

दिसत होती ती फक्त उडणारी धूळ, झाडांची पाने, एखादा जीव गेलेला पेपर….. थोड्याच वेळात पावसाला सुरूवात झाली आणि जे दिसत होतं ते पण दिसेनासं झालं…  आता दिसत होत्या त्या फक्त कोसळणाऱ्या धारा, गारांसारखे दिसणारे टपोरे थेंब, काही मिनिटातच रस्त्यावरून वाहणारे पाण्याचे लोट, झाडाची तुटलेली फांदी, रस्त्यात उभ्या असलेल्या माणसाविना असणार्‍या गाड्या,  आणि दूरवर दिसणारी पावसाने झाकलेली टेकडी….

पावसाला सुरूवात झाली… दरवर्षी नेमाने येणारा तरीही येत पर्यंत अगदी चातकासारखी वाट पाहायला लावणारा हा पाऊस… तापलेल्या उन्हाळ्यानंतर येणारा पाऊस म्हणजे तहानलेल्या जिवाला आसरा जणू.  लहानपणी पावसात भिजण्यात जितका आनंद होतो तितकाच मोठेपणीही…. आपल्या नातवला कागदाची होडी करून दाखवून ती पाण्यात सोडताना लहान होणारे आजोबा आपले बालपणच जगत असतात… परत एकदा…. पावसात फुटबॉल खेळणाऱ्या चिखलाने माखालेल्या मुलांचाही हेवा वाटायला लावणारा हा पाऊस… बालपण तात्पुरतं का होईना परत देणारा हा पाऊस…

घरी बसून आईच्या हातची भजी खात, चहा घेत गप्पांना आलेला उत, त्यातच पावसात चिप्प भिजत येणारी एखादी बहीण किंवा भाऊ, जातानाच छत्री, रेनकोट काही नेता येत नाही का म्हणून रागवणारी तरीही सर्दी होईल म्हणून घसाघसा डोकं पुसनारी आई… आणि… गप्पात परत सामील होत खोड्या काढणारा भाऊ अथवा बहीण…. रोजच्या धावपळीत तात्पुरतं का होईना  सर्वांना एकत्र बसायला लावणारा हा पाऊस….

आधीच सुटलेला अंगावर शहारे आणणारा थंडगार वारा, त्यात त्याची वाट पाहत उभी असलेली ती, तिला दुरून बघत तिच्या चेहऱ्यावर उडणार्‍या बटा हाताने दूर करण्याचा मोह आवरत तिला न्याहाळणारा तो… त्याला समोर बघताच  खोडकर हसू लपवत, लटके रागवारी ती… अचानक ढगाचा आवाज होताच त्याला बीलगणारी ती… त्याच्या प्रियासीचा राग घालवण्याचे सामर्थ्य असलेला हा पाऊस….

दुरावलेल्या मित्रांची अचानक झालेली फोनाफोनी, ठरलेला ट्रेकिंगचा बेत, अंगावर पाऊस झेलत एकमेकांना हात देत चढलेली चढण, रानावानातून हिंडत चिखल तुडवत गाठलेला एखादा गड, रस्त्यातल्या एखाद्या टपरिवर कितीतरी दिवसांनी घेतलेला एकत्र चहा… दुरावलेल्या मैत्रिला जवळ आणणारा हा पाऊस…

रानावानातून झुळझुळ वाहणारे झरे, एखादा लगीन घाईने कोसळणारा धबधबा, गावातावर दिसणारे दवबिंदू, धुक्याने वेढलेले पर्वताचे टोक, पाठशिवणीचा खेळ खेळत मधेच सूर्याला संधी देणारे ढग आणि सजलेल्या हिरव्या शालुने नटलेल्या धरतीला बघण्यासाठी आसुसलेला सूर्य… निसर्गाचा अत्तुत्तम आविष्कार म्हणजे पाऊस…